top of page
Marble Surface

'डोह' -श्रीनिवास विनायक कुलकर्णी



'डोह' हा ललित लेखनशैली मध्ये मोडला जाणारा पुस्तक प्रकार आहे . आधी मला वाटायचं ललित लिखाण म्हणजे प्रेमाच्या गोष्टी ज्यात एखादा प्रियकर आपल्या प्रेमाच वर्णन करायचा पण या पुस्तकाने माझा तो गैरसमज दूर करून नवीन प्रकार वाचण्यास प्रवृत्त केलं.


डोह मधला लेखक वाचताना खूप innocent जाणवतो ,त्यांच्या लहानपणीच्या गोष्टी वाचताना वाचकाचं बालपण समोर आल्याशिवाय रहात नाही आणि मग अचानक थोडावेळ पुस्तक बाजूला ठेवून आपण सुद्धा आपल्या बालपणीच्या आठवणींमध्ये रममाण होतो.


बालपणी लेखकाच्या सानिध्यात असलेला परिसर ,त्यातील पक्षी ,प्राणी ,वेगवेळ्या प्रवृत्तीची माणसं ,तिथला निसर्ग या सगळ्यांचे वर्णन खूप जिवंत वाटतं आणि म्हणूनच बालपण देगा देवा असं म्हटल्यावाचून राहता येत नाही.


मला सर्वात भावलेली गोष्ट म्हणजे -यात लेखकाचे दादा ह्यांच्या साहसी वृत्तीच जे दर्शन मिळते ते एक पॅरेण्ट म्हणून आपण सुद्धा आत्मसात करावं असं वाटतं आणि लेखकाच्या स्मरणशक्तीचा सुद्धा कुठेतरी हेवा वाटतो.


ललित लिखाणाबद्दल उत्सुकता असल्यास हे पुस्तक नक्की वाचा .




 
 
 

Comments


bottom of page