top of page
Marble Surface

Do It Today Book Review & Takeaways: Habit-Building Strategies

Updated: Aug 18, 2025

"MUST READ" category book


Do It Today book summary illustration showing tips to stop procrastination and build daily habits."


आपण सतत कामं पुढे ढकलत असाल किंवा टाळाटाळ करत असाल तर हे पुस्तक नक्की तुमच्यासाठी आहे . जसे की एखादं काम सुरू करण्यासाठी आपण आज नाही उद्या करू आणि उद्या नाही परवा करू असं करत करत उद्या/परवा कधी उजडतच नाही . दिरंगाई/आळशीपणा ही एक सवय आहे ज्याचा आपल्यापैकी अनेकांना सामना करावा लागतो, त्यामुळे आपण अनेकदा विलंब करतो आणि मग पश्चातापाशिवाय काहीच उरत नाही.


Darius Foroux लिखित "Do It Today self-help book (review)" - एक "SELF HELP" book आहे . इतर book पेक्षा हे वेगळं यासाठी आहे कारण यात theory पेक्षा लेखकाचे अनुभव आणि स्वतः केलेले प्रयोग आहेत . अत्यंत practical आणि straightforward ,सोबत साध्या English मध्ये लिहिलेलं आहे म्हणून समजायला अधिकच सोप्पं आहे . विशेष म्हणजे प्रत्येक वयोगट वाचू शकतो असं हे book आहे .


लेखक फक्त अधिक काम करण्यावर लक्ष केंद्रित करत नाही तर तो वाचकांना त्यांच्या दैनंदिन सवयी त्यांच्या दीर्घकालीन उद्दिष्टांसह कश्या साधता येईल ते शिकवतो. यातल्या बर्याचश्या गोष्टी आपण relate करू शकतो, यातली solutions follow करण्यास सोपे आहेत. तुम्ही procrastination वर मात करण्याचा विचार करत असाल, तुमच्या वेळेचा अधिक चांगला वापर करण्याच्या विचारांत असाल किंवा तुमचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याच्या तयारीत असाल तर ,या पुस्तकातील धडे सखोलपणे अभ्यासा.यातला प्रत्येक धडा तुम्हाला तुमचा वेळ कसा वापरायचा आणि priorities कश्या सेट करायच्या त्याबद्दल विचार करण्यास प्रवृत्त करतो. हे धडे अंमलात आणून, आजपासून तुम्ही नेहमी ज्या जीवनाची कल्पना केली होती त्या जीवनाच्या जवळ जाऊ शकता.म्हणून मी म्हणेल हे book "MUST READ" category मध्ये असायलाच हवं.


काही Life changing मुद्दे-(Do It Today self-help book review)


१)right time ची वाट बघणे बंद करा.Motivation ची वाट न बघता काम सुरु करा व consistency कडे लक्ष द्या.


२)लेखक,routine तयार करून व क्षुल्लक निर्णय कमी करून जीवन सोपे करण्याचे सुचवतो.


३)महत्त्वाचे व अर्थपूर्ण कामासाठी तुमची मानसिक ऊर्जा वाचवायचे लेखक नमूद करतो.


४)कामावर आणि प्रगतीवर लक्ष केंद्रित करा. perfection आपोआपच पाठलाग करेल.


५)procrastination हि एक सवय आहे .जसआपण कुठलीही गोष्ट शिकू शकतो तसं ह्या सवयींवर सुद्धा मात करू शकतो.


६)प्रत्येक वाया गेलेला क्षण म्हणजे तुम्हाला हवे असलेले आयुष्य घडवण्याची गमावलेली संधी,म्हणून वेळेचा सदुपयोग करा.




Comments


bottom of page